Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी जिल्ह्यातील 17 धर्मादाय रूग्णालये कार्यरत…

राजेश भोई by राजेश भोई
November 25, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी जिल्ह्यातील 17 धर्मादाय रूग्णालये कार्यरत…
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आता सोलापूर जिल्ह्यातील १७ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास ५० टक्के सवलत मिळणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धर्मादाय रुग्णालयाची जिल्हास्तरीय समितीची बैठक घेतली. या बैठकीत त्याची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका झाल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना निर्धन, दुर्बल घटकातील रुग्णांच्या उपचारांसाठी सवलत देण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये ज्यांची सार्वजनिक न्यास म्हणून नोंद झाली आहे. धर्मादाय न्यास जे धर्मादाय

रुग्णालय ज्यामध्ये सुश्रुषालय, प्रसूतिगृह दवाखाना यांना एकूण खाटांच्या संख्येपैकी एकूण १० टक्के खाटा निर्धन व १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी एकूण खाटांपैकी २० टक्के खाटा आरक्षित ठेवून अशा रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना खाटा, निवासी वैद्यकीय अधिकार सेवा, सुश्रुषा, अन्न, कापड, पाणी, वीज, नित्य निदान विषयक सेवा इतर सर्वसामान्य सेवा मोफत दिल्या जातात. त्यासाठी ज्या रुग्णांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार रुपयांच्या आत आहे, अशा रुग्णांना निर्धन घटकात समावेश करुन वैद्यकीय तपासणी, उपचार व औषधे मोफत दिले जातात.

तसेच रुग्णांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ६० हजार रुपयांच्या आत आहे, अशा रुग्णांना दुर्बल घटकातील रुग्ण घटकांत समावेश करून वैद्यकीय तपासणी व उपचारात ५० टक्के सवलत दिली जाते. औषधे, उपयोगात आणलेल्या वस्तू व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू यांचा आकार हा रुग्णालयांनी केलेल्या खरेदीच्या किंमतीत लावण्यात येतो. मात्र सदर रुग्णास या वस्तुंची ५० टक्के किंमत द्यावी लागते.

ही लागणार कागदपत्रे
रुग्णांनी उत्पन्नांच्या पुराव्यासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, पिवळी, केशरी शिधापत्रिका यापैकी एक दस्तऐवज संबंधित धर्मादाय रुग्णालयात सादर करावे लागणार आहे. धर्मादाय रुग्णालयांतील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास धर्मादाय उपायुक्त, सोलापूर यांच्या कार्यालयात तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सोलापुरातील या रुग्णालयांचा समावेश
रुग्णालयांची यादी पुढीलप्रमाणे

पंडीत दिनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय व हॉस्पिटल,
पत्ता – १९/१, पंडीत दिनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, केगांव, देगाव रोड, सोलापूर
नाव – श्री. संतोष देशमाने, संपर्क क्र. 7972688224

आश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर,
पत्ता – गट नं. 261 आणि 262, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर.
नाव – डॉ. उमाकांत ढगे, संपर्क क्र. 9423590415/ डॉ.करजखेडे संपर्क क्र. 7719094216,

श्री जगदाळे मामा हॉस्पिटल,
पत्ता – कर्मवीर नगर, बार्शी, जि. सोलापूर
नाव – श्री सचिन गारमपल्ली, संपर्क क्र. 9676755620

नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल,
पत्ता – बार्शी, आगळगाव रोड, जि. सोलापूर
नाव – श्री. राहुल शिराळ , संपर्क क्र. 9822741529

शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय,
पत्ता – ११८/११९, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदीक हॉस्पिटल, जुनी फौजदार चावडी जवळ, सोलापूर
नाव – श्री. डी. आर. समर्थ, संपर्क क्र. 8766825261

यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
पत्ता – ६१५८, सिध्देश्वर पेठ, जिल्हा परिषद जवळ, सोलापूर
नाव – श्री. सुकांत बेळे, संपर्क क्र. 9595258488

जनकल्याण हॉस्पिटल,
पत्ता – ६२/१/२, जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर
नाव – डॉ. सुधीर शिनगारे, संपर्क क्र. 9922614724

श्री. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,
पत्ता – २७६/१ पी, दैनिक संचार ऑफीस जवळ, सोलापूर
नाव – श्री. हनमंत पाटील, संपर्क क्र. 8805450565

युगांधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
पत्ता – २८३/१ बी, होटगी रोड, मुलतानी बेकरी मागे, सोलापूर
नाव – श्री. राहुल यमाजी, संपर्क क्र. 9403412249

लोकमंगल जीवक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,
पत्ता – पी १२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट, एम.आय.डी.सी. प्लॉट नं. १२, निलम नगर, सोलापूर
नाव – श्री. अंबादास सिलगारी, संपर्क क्र. 8975722093

धनराज गिरजी हॉस्पिटल ट्रस्ट,
पत्ता – ४, रेल्वे लाईन, सोलापूर महानगरपालिकेच्या मागे, सोलापूर
नाव – श्री. चोपडे एस. एस., संपर्क क्र. 9850989053

श्री विठ्ठल हॉस्पिटल,
पत्ता – पुणे रोड, के.बी.पी. कॉलेजच्या समोर, पंढरपूर, जि. सोलापूर
नाव – नुतन मोरे संपर्क क्र. ९९२२१९५१

लायन्स मधुराबाई फत्तेचंद ब्रिजमोहन दमाणी हॉस्पिटल, लॉयन बी.पी. नेत्रालय, मथुराबाई फत्तेचंद हॉस्पिटल,
पत्ता – १२५, दमाणी नगर, पावन गणपती जवळ, सोलापूर
नाव – डॉ. शिवाजी पाटील, संपर्क क्र. ९६६५६९६३15

अल-फैज जनरल हॉस्पिटल,
पत्ता -सिध्देश्वर पेठ, बेगम पेठ पोलिस चौकी जवळ, सोलापूर
नाव – बिलाल मोमीन, संपर्क क्र. ९१९२९९२421

गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल,
पत्ता -१३, बुधवार पेठ, १४ बाळीवेस रोड, विद्यानंद कॉ. ऑप बँके जवळ, सोलापूर
नाव – रमेश कांबळे, संपर्क क्र. ९८५०३२८३24

इंडियन कॅन्सर सोसायटी,
पत्ता – ८३८९/२ बी, रेल्वे लाईन, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर
नाव – पियुषा देशपांडे, संपर्क क्र. 9975502544

श्रीमती मल्लावाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्पिटल,
पत्ता – २,३, गणेश शॉपींग सेंटर, सोमवार पेठ, सोलापूर
नाव – श्रीनिवास मंताठी, संपर्क क्र. ९४२३५३६188

Previous Post

शोभा नर्सिंग होमच्या टेस्ट बेबी सेंटर मध्ये जन्मली पाच हजार बालके.

Next Post

आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर १५ मजली इमारती शक्य; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Related Posts

सीएसआर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक भेट
सोलापूर शहर

सीएसआर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक भेट

November 29, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन
राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन

November 29, 2025
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!
सोलापूर शहर

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!

November 29, 2025
सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड
क्राईम

सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड

November 29, 2025
तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक
क्राईम

तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक

November 29, 2025
दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख
सोलापूर शहर

दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख

November 27, 2025
Next Post
आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर १५ मजली इमारती शक्य; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर १५ मजली इमारती शक्य; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025