सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी २५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले. राजकारणात राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मनसे व शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. मनसे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्जाचे वाटप झाले आहे. हे अर्ज शनिवारपर्यंत (ता. २०) भरून द्यावेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी दिली.

मनसेचे शहरप्रमुख जैनुद्दीन शेख यांच्या पत्नी नौशाद जैनुद्दीन शेख, विनायक माढेकर यांनी अर्ज घेतले. शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, सुभाष माने, जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी अर्ज घेतले. यावेळी लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष श्री अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर, सुभाष माने उपस्थित होते.







