सोलापूर: नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन, नवी दिल्ली कडून पुर्नःमानांकन प्राप्त झालेला विजापूर रोडवरील ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड (PCL), सोलापूर या नामांकित कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला. प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड सोलापूर च्या श्री अमोल पानसरे सीनियर मॅनेजर प्रोडक्शन, पारितोष खेर मॅनेजर एच आर, श्री प्रदीप उघडे डेप्युटी मॅनेजर एच आर व प्रकाश गायकवाड एच आर ऑफिसर या अधिकाऱ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या 25 विद्यार्थ्यांची निवड केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस. ए. पाटील, संस्थेचे सचिव मा.. एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. के. मोहिते व महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक. एम. एम. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागीय प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक श्री ए. आर. मळेकर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक जे पी पिंजार व बी ई नरोटे यांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख श्री. आर. एस. मोटगी यांचेही सदर कार्यक्रमास सहकार्य लाभले.










