1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त; शहर गुन्हे शाखेची कारवाई
साेलापूर : दिवसा घराेडी करणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीच्या 4 सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. शेरअली माेती सय्यद (वय 25, रा. भाेसा राेड, इंदीरा नगर, मशिदजवळ, जि. यवतमाळ), प्रसन्न प्रमाेद मेश्राम (वय 24, रा. डी.एड काॅलेज, भाेसा राेड, जि.यवतमाळ), चंदु हिरा भतकल (वय 39, रा. बाेरगांव, मेघे टेकडी, जि. वर्धा), राेशन पुरुषाेत्तम प्रधान (वय 27, रा. सुराना ले-आउट, अंबिका नगर, जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
25 ऑक्टाेबर 2025 राेजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहाच्या दरम्यान जुळे साेलापुरातील गाेंविदश्री मंगल कार्यालय येथे बंद घरात काेणीही नसल्याचा फायदा घेऊन चाेरट्यांनी घराचे कुलूप ताेडुन घरातील साेन्याचे दागिने व राेख रक्कम चाेरून नेली हाेती. तसेच काेणार्क नगर येथील बंद घर ाेडून 40 हजारांचा ऐवज चाेरून नेण्यात आला हाेता. याबाबत गाैतम मारुती गायकवाड आणि सिध्दप्पा विठ्ठल बिडवे यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विजापुर नाका पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
दिवसाढवळ्या घराेड्या झाल्याने या गुन्ह्यांचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी घटनास्थळ तसेच साेलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी. सी. टी. व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे यातील चार आराेपीची ओळख पटवली. या आराेपींच्या मागावर असताना 29 ऑक्टाेबर राेजी रात्री शहर गुन्हे शाखेच्या पाेलिसांना वरील संशयित हे जुना पुना नाका परिसरात संशयीतरित्या िफरत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यावरुन पाेलिसांनी जुना पुना नाक्याजवळील आकांक्षा टुर्स ट्रॅव्हल्स जवळील जागेतून वरील चाैघांना ताब्यात घेऊन त्यांची चाैकशी केली. त्यावेळी त्यांनी त्यांची नावे शेरअली माेती सय्यद, प्रसन्न प्रमाेद मेश्राम, चंदु हिरा भतकल, राेशन पुरुषाेत्तम प्रधान अशी सांगितली. पाेलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातून दाेन गुन्हयातील 10 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिणे व 15 हजार रुपये राेख रक्कम असा एकूण 1 लाख 19 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आराेपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, आराेपींना न्यायालयाने आराेर्पीना पाेलीस काेठडी सुनावली आहे.
यांनी केली कामगिरी…
सदरची कामगिरी पाेलिस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डाॅ अश्विनी पाटील, सहायक आयुक्त राजन माने, पाेलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक विजय पाटील, पाेलीस अंमलदार जावीद जमादार, महेश शिंदे, अनिल जाधव, धिरज सातपुते, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, राजु मुदगल तसेच सायबर पाेलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठाेड यांनी केली.







