सोलापूर : सोलापूरमध्ये विरोधी गटातील महत्त्वाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून गळाला लावले जात आहे. याच मोहीमेचा एक भाग म्हणून आज मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. मात्र, दुसरीकडे भाजपमध्ये होणाऱ्या या इनकमिंगला भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध दर्शवला होता. या विरोधामुळेच काँग्रेसचे माजी आमदार राहिलेल्या दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला तुर्तास ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात आज हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे यांच्या असंख्य सोलापूरचे नेतेमंडळी एकाच मंचावर पाहायला मिळाले. मात्र आमदार सुभाष देशमुखांच्या विरोधामुळेच दिलीप मानेंचा भाजप प्रवेशाला रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.







