सोलापूर ; राज्यभर दरवर्षीप्रमाणे यंदाही लाचलुचपत दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात सुरू झाला आहे. सत्यनिष्ठेच्या संस्कृतीतून राष्ट्र समृद्धी या ब्रीदवाक्याखाली आयोजित या सप्ताहात विविध उफक्रम उपक्रम राबविण्यात येत आहेत. दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केला जाणारा हा उपक्रम राज्य शासनाच्या सर्व विभागांत, स्वायत्त संस्था, सहकारी संस्था व अंगीकृत उपक्रमांमार्फत राबविण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयातर्फे सप्ताहाची सुरुवात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन झाली. विभागप्रमुख व अधिकारी यांनी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मूल्याधिष्ठित सेवा निष्ठेने पुरवू, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन घडवू अशी प्रतिज्ञा घेतली. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले. या अभियानात समाजातील निष्कलंक स्वयंसेवी संस्था, स्त्री संघटना, सेवाभावी संस्था, वाहनचालक संघटना तसेच सामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात येत आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृतीसाठी सार्वजनिक वाहनांवर जागरूकता स्टिकर्स लावण्यात येत आहेत.
भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदविण्यास नागरिकांनी येथे संपर्क साधावा.
टोल फ्री हेल्पलाइन : १०६४,
फोन क्रमांक : ०२१७-२३१२६६८,
मोबाइल क्रमांक ९४०४००१०६४,
ई-मेल: dyspacbsolapurgmail.com







