डीजीसीएकडून मिळणार परवानगी : ‘फ्लाय ९१’कडून सलग २ दिवस सेवा रद्द
सोलापूर : स्टारएअरकडून शुक्रवारपासून ७ नोव्हेंबरपासून सोलापूर मुंबई रोजची विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी सोलापूर विमानतळ प्रशासनाने परवानगी द्यावी, असा ई-मेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रशासनाला पाठवला आहे.
प्रशासनाने हा मेल डीजीसीएकडे पाठवला असून, लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरीनंतर ‘स्टारएअर’ रोज सेवा सुरू करणार आहे.
स्टारएअरच्या वेबसाइटवर ७ ते ११ नोव्हेंबरपर्यंत तिकीट बुकिंग सुरू असून, दर ३ हजार ९९९ रुपये दर्शविण्यात आले आहेत. बुकिंग वाढताच दरही वाढतील. सोलापूर विमानतळाचे सहायक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी सांगितले, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘स्टारएअर’चा मेल आला असून, ७ नोव्हेंबरपासून रोज सेवा सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. हा मेल डीजीसीएकडे पाठवला असून, मंजुरीनंतर सेवा सुरू होईल.
दुसरीकडे तांत्रिक कारणांमुळे ‘फ्लाय २१’ विमानसेवेने ने बुधवारी दि. २९ ऑक्टोबर व शुक्रवारी दि. ३१ ऑक्टोबर रोजीची सेवा रद्द केली. पूर्वी शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवार असे चार दिवस सेवा सुरू असायचे. आता यात बदल होऊन शुक्रवार, रविवार, सोमवार आणि बुधवार असे चार दिवस विमानसेवा देणार आहेत.







