Tuesday, December 16, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

*उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची, वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप

राजेश भोई by राजेश भोई
November 2, 2025
in सोलापूर जिल्हा
0
*उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कार्तिकीची, वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप
0
SHARES
54
VIEWS

पंढरपूर, :- वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती सह प्रदूषणीय आपत्ती मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. नगर विकास विभागाच्या मार्फत राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगरपंचायती मध्ये “अर्बन फॉरेस्ट” हा उपक्रम राबवण्यात येणार असून यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग व महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृह (शहरे), महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार तानाजी सावंत, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम. देवेंद्र सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज मुळे मे महिन्यात, नोव्हेंबर मध्ये पाऊस पडणे तसेच पावसाळ्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी सर्व नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्याप्रमाणेच ठाणे महापालिकेने चार ठिकाणी अर्बन फॉरेस्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे. तरी राज्यातील सर्व शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट अंतर्गत वृक्ष लागवड करावी. त्याप्रमाणेच राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टर पर्यंत वाढवावे, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयत्न करावेत. बांबू ही बहुपर्यायी तसेच पर्यावरण पूरक वृक्ष लागवड आहे असे त्यांनी सांगितले.


राज्यातील शेतकऱ्यावर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठे संकट आलेले आहे, शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने समिती गठीत केलेली आहे. या संकटाच्या काळात जी तातडीची मदत करावयाची होती ते शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करत असल्याचेही माहिती उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली. पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून लहान मुलांमध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी त्यांना शालेय जीवनापासूनच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व याबाबत जागृत केले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती शिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच आषाढी व कार्तिकी वारी पुरते पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याशिवाय संपूर्ण वर्षभर सातत्याने असे उपक्रम राज्यभरात घेण्यासाठी प्रदूषण मंडळ व पर्यावरण विभागाने नियोजन करावे, यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


राज्यातील सर्व गड किल्ले ही खूप मोठी संपत्ती असून हे गड किल्ले स्वच्छ करण्याची मोहीम लवकरच रायगड किल्ल्यापासून करावी. प्रदूषण मंडळाने पर्यावरण समतोल तसेच जनजागृतीसाठी अद्यावत तंत्रज्ञान चा वापर करावा. सध्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कुशल पद्धतीने करावा. पर्यावरण संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. पर्यावरण पूरक विकासासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा तसेच प्रत्येकाने राज्याच्या सर्वांगीण विकासाचे वारकरी व्हावे असेही आवाहन त्यांनी केले.


महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असलेल्या बांबू लागवडीचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण राज्यभरात जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी संस्कृती कला मंचच्या वतीने किर्तन, भारुड, गोंधळ व पोवाडा या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कीर्तनकार प्रकाश खांडगे, मानसी बडवे, शैलजा खांडगे, योगेश चिकटगावकर, शाहीर प्रवीण जाधव यांचा सन्मान उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री महोदय तसेच सर्व मान्यवरांनी टाळ मृदंगाच्या गजरात पावली केली. यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी या पर्यावरण शिक्षण उपक्रमाचा समारोप झाला.
प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव एम.डी. सिंह यांनी प्रस्ताविक केले तर आभार संजय भुस्कुटे यांनी मानले

Previous Post

संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण पोलीस आयुक्त एम.राजकुमार!

Related Posts

मुलं रमली पुस्तकात; शिक्षणाधिकाऱ्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
सोलापूर जिल्हा

मुलं रमली पुस्तकात; शिक्षणाधिकाऱ्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

December 16, 2025
पंढरपूर-तिरुपती एक्स्प्रेसला बार्शी, मोडनिंब, धाराशिव थांबा मंजूर
सोलापूर जिल्हा

पंढरपूर-तिरुपती एक्स्प्रेसला बार्शी, मोडनिंब, धाराशिव थांबा मंजूर

December 16, 2025
ब्रेकिंग : पन्नास हजारची लाच घेताना उत्तरचा नायब तहसीलदार एसीबीच्या ताब्यात..!
क्राईम

ब्रेकिंग : पन्नास हजारची लाच घेताना उत्तरचा नायब तहसीलदार एसीबीच्या ताब्यात..!

December 15, 2025
१५१ विद्यार्थ्यांनी दिली संविधान गौरव परीक्षा..
सोलापूर जिल्हा

१५१ विद्यार्थ्यांनी दिली संविधान गौरव परीक्षा..

December 15, 2025
दयानंद’ मध्ये १७, १८ रोजी मराठी साहित्य संमेलन
सोलापूर जिल्हा

दयानंद’ मध्ये १७, १८ रोजी मराठी साहित्य संमेलन

December 15, 2025
ई-पीक पाहणीतून सुटलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ऑफलाईन’चा पर्याय
शेती

ई-पीक पाहणीतून सुटलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ऑफलाईन’चा पर्याय

December 15, 2025
Next Post
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण पोलीस आयुक्त एम.राजकुमार!

आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण पोलीस आयुक्त एम.राजकुमार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025