सोलापूर : जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपने निश्चित केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मुख्य जबाबदारी देण्यात आली. महापालिका निवडणुकीची जबाबदारी रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडे दिली आहे. २०१७ मध्ये त्यांच्याकडे जबाबदारी असताना भाजपने यश मिळवले होते. सोलापूर पूर्वची जबाबदारी माजी आमदार राम सातपुतेंकडे तर पश्चिमची (माढा) जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जबाबदारी सोपवली. सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत शरद कुलकर्णी हे प्रभारी होते. त्यांनी पालिकेत सत्ता आणली. आता त्यांच्याकडे पुन्हा जबाबदारी देण्यात आली.









