सोलापूर ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर जिल्हा आढावा बैठक नुकतीच वरळी मुंबई येथे पार पडली या बैठकी प्रसंगी सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील सामाजिक सामाजिक समीकरण पाहता सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ग्रामीण उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहर व जिल्ह्य़ा करीता संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जोडीला सहसंपर्क मंत्री म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली असता या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संपर्क मंत्री दत्तात्रय भारणे यांनी तात्काळ दखल घेत सोलापूर शहर जिल्ह्यामध्यील सामाजिक समीकरण पाहून सोलापूर शहर जिल्ह्यासाठी सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे यांचे निवड केली त्याबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तसेच शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेशचे उपाध्यक्ष किसनजी जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे ज्येष्ठ नेते तोफिक शेख यांनी या निवडीचे स्वागत केले




.
येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे संपर्क मंत्री यांच्याबरोबर सहसंपर्क मंत्री म्हणून अण्णा बनसोडे हे देखील सोलापूरच्या निवडणुकीमध्ये सक्रीय सहभाग नोंदवणार असून येणाऱ्या काळामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठका घेऊन या निवडणुकीचा बाबतीत आढावा घेणार आहेत या दोन नेत्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येणारे निवडणूक अतिशय जोमाने लढण्याचा माणस सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे…!







