पंढरपूर ; प्रक्षाळपूजेनिमित्त रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. यासाठी पिवळा गोंडा २०० किलो, लाल गोंडा २०० किलो, पांढरी शेवंती २०० किलो, अशोक पाला १०० लडी, कलर गुलाब ३०० बंडल, ओर्केट ४० बंडल, अँथेरियम १०० काडी, शेवंती १५०० काडी, सॉग २५, ड्रेस ना २५, टेबल पॉम २५, रामबाण ४० बंडल, मोच्या २० बंडल, कारनेशन १५० बंडल इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. सदरची सजावट विठ्ठल भक्त अमोल शेरे, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असल्याचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले.







