सोलापूर :- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी सोलापूर परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे यांची नियुक्ती करण्यात आली.सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या शिफारशीनुसार प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेश कोषाध्यक्ष तथा सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते मुस्तारे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी माजी खासदार आनंद परांजपे,प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,सरचिटणीस संजय तटकरे,प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण,राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस डाॅ.बसवराज बगले आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.









