Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१६ नोव्हेंबरला लोकमंगलचा ४६ सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार

राजेश भोई by राजेश भोई
November 13, 2025
in सोलापूर शहर
0
१६ नोव्हेंबरला लोकमंगलचा ४६ सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार
0
SHARES
20
VIEWS

51 जोडपी विवाह बंधनात अडकणार; आमदार सुभाष देशमुख यांची माहिती

सोलापूर : दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनतर्फे यावर्षीदेखील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा 46 वा सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.08 वाजता, गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.यंदाचे विवाह सोहळ्याचे 20 वे वर्ष असून यावेळी 51 जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधू-वरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा हा उद्देश असून, विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे. वधू-वरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहउपयोगी साहित्याची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे.
भोजनव्यवस्थेपासून ते नववधू-वरांचे कपडे व सर्व सुविधा फाउंडेशनतर्फे पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय वधू वरांची शहरातील प्रमुख मार्गाने रथामधून मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत. यंदा 49 जोडप्यांमध्ये 3 बौद्ध जोडपे तसेच 46 हिंदू जोडपे आहेत

सोहळ्याचे संपूर्ण स्थळ २५० बाय २०० फूट क्षेत्रफळामध्ये तयार करण्यात येणार असून भोजन व्यवस्था ९० बाय १५० फूट जागेत असेल. संपूर्ण कार्यक्रम स्थळावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यात दोन्हीकडील सुमारे 25- 30 हजार वऱ्हाडी मंडळींना भोजनाची सोय करण्यात आले आहे.भोजनात चपाती भाजी, भात व बुंदी याचा समावेश असणार आहे याशिवाय दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.तसेच नवविवाहात जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर, अभय पटणी, सुजाता सुतार, उत्तम शिंदे, बाळासाहेब घोडके, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण आधी उपस्थित होते

आतापर्यंत 3153 जोडपी विवाहबद्ध
लोकमंगल फाउंडेशनमार्फत एकूण ४6 सामूहिक विवाह सोहळे पार पडले आहेत. आतापर्यंत 3153 जोडपी विवाहबद्ध झाली असून त्यापैकी—हिंदू : २४४३ जोडपी, बौद्ध : ६७८ जोडपी,मुस्लिम : २१ जोडपी, ख्रिश्चन : ०४ जोडपी, जैन : ०७ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

यंदा जिल्हा पर्यटनाची थीम
विवाह सोहळ्याला यंदा विशेष आकर्षण मिळणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी सुरू केलेल्या ‘जिल्हा पर्यटन महोत्सवा’च्या धर्तीवर या विवाह सोहळ्यातही जिल्हा पर्यटन थीम राबविण्यात येत आहे. विवाह सोहळा आयोजित करण्यात येणाऱ्या ग्राउंडवर जिल्ह्यातील विविध गावांची वैशिष्ट्ये आणि पर्यटनस्थळांची माहिती आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केली जाणार आहे. पर्यटनदृष्ट्या महत्वाची असणारी ठिकाणे, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा दर्शविणारे पॅनेल्स, माहिती फलक आणि मांडणी याचा समावेश असेल. विशेष म्हणजे, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सोहळा स्थळी ठेवण्यात येणार असून “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा प्रेरणादायी संदेशही झळकविण्यात येणार आहे.

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार; केंद्राने मागविला प्रस्ताव

Next Post

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Related Posts

सीएसआर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक भेट
सोलापूर शहर

सीएसआर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक भेट

November 29, 2025
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!
सोलापूर शहर

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!

November 29, 2025
सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड
क्राईम

सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड

November 29, 2025
तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक
क्राईम

तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक

November 29, 2025
दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख
सोलापूर शहर

दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख

November 27, 2025
हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द
सोलापूर जिल्हा

हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

November 27, 2025
Next Post
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025