सोलापूर : सो लापूर शहरातील आंबेडकर चवळीतील अग्रेसर नेते असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवि गायकवाड यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रवेशामुळे सोलापूरमधील आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी ही घडामोड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत सोलापुरात वंचित राबवणार अकोला पॅटर्न होणार असल्याच्या चर्चा सध्या सोलापुरात आहे.सोलापूर महापालिका निवडणुकीत अकोला पॅटर्न राबवणार असल्याची वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली आहे. ओबीसी, अल्पसंख्यांकांचा रोष हा प्रस्थापितांच्या विरोधात असल्याने त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी सोलापुरात अकोला पॅटर्न राबवणार असल्याची वंचितचे नेते अतिश बनसोडे यांनी घोषणा केली आहे.त्यामुळे रवी गायकवाड यांच्या वंचित प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी सोलापुरात पुन्हा एकदा ताकतीने सक्रिय झाल्यास बोलल जात आहे.








