सोलापूर : सोलापुरातील रामवाडी येथील शासकीय गोदामातून आज प्रत्येक तालुक्यासाठी ईव्हीएमचे वाटप पूर्ण झाले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ७ हजार ५०० बॅलेट युनिट व ३ हजार ३६६ कंट्रोल युनिट जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. आज सकाळी दहापासून ईव्हीएम वाटपाला सुरुवात झाली. या प्रक्रियेची पाहणी महसूलचे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केली.
करमाळ्यासाठी ६८० बॅलेट युनिट व ३०० कंट्रोल युनिट, माढ्यासाठी ७८० बॅलेट युनिट व ३५० कंट्रोल युनिट, बार्शीसाठी ६८० बॅलेट युनिट व ३०० कंट्रोल युनिट, उत्तर सोलापूरसाठी ३८० बॅलेट युनिट व १४० कंट्रोल युनिट, मोहोळसाठी ४८० बॅलेट युनिट व २६० कंट्रोल युनिट, पंढरपूरसाठी ८०० बॅलेट युनिट व ३७० कंट्रोल युनिट देण्यात आले आहेत. माळशिरससाठी ९०० बॅलेट युनिट व ४३१ कंट्रोल युनिट, सांगोल्यासाठी ७६० बॅलेट युनिट व ३४० कंट्रोल युनिट, मंगळवेढासाठी ५८० बॅलेट युनिट व २४० कंट्रोल युनिट, दक्षिण सोलापूरसाठी ६८० बॅलेट युनिट व २९० कंट्रोल युनिट आणि अक्कलकोटसाठी ७८० बॅलेट युनिट व ३४५ कंट्रोल युनिट देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक तीन नगरपरिषदांची निवडणूक अक्कलकोट तालुक्यात होत आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात एकही नगरपरिषद नसल्याने या तालुक्यातील बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट थेट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वापरले जाणार आहेत.







