सोलापूर : छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय येथे 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बाल दिन व आंतरराष्ट्रीय दत्तक दिनाचे औचित साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालस्नेही वातावरण व वैद्यकीय सेवा यंत्रणेतील कामकाज बाबत सुसूत्रता याविषयी एक दिवसीय कार्यशाळे चे ही आयोजनकरण्यात आले होते ,
या प्रसंगी बाल कल्याण समिती सोलापूरचे अध्यक्ष समीर सय्यद,रुग्णालयाचे अधिष्ठाता ऋत्विक जयकर,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अँड रेश्मा गायकवाड ,अँड सुवर्णा कोकरे , स्त्री व प्रसूती विभाग प्रमुख डॉ.तिरणकर,बाल रोग विभाग प्रमुख डॉक्टर बंदीचोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष तोडकर ,व इतर विभागाचे अध्यापक,निवासी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, व समाजसेवा अधीक्षक कार्यशाळेस उपस्थित होते. व रुग्णालयाचे अधिष्ठाता ऋत्विक जयकर यांचेही मोलाची मार्गदर्शन लाभले..!









