सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडील मालमत्ता विभागाचे अभिलेखावर आढळ न होणाऱ्या मिळकती, दुबार नोंद असलेल्या मिळकती व आढळ न होणारे पैकी नळांच्या मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहेत. याकरीता मा.आयुक्त यांनी दि.१३/११/२०२५ रोजी मालमत्ता कर विभागाची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये सर्वच पेठांमध्ये आढळ न होणाऱ्या मिळकती, दुबार नोंद असलेल्या मिळकती व आढळ न होणारे पैकी नळ असल्याचे कर निरिक्षकांकडील माहितीमध्ये दिसून आले. आढळ न होणाऱ्या मिळकती, दुबार नोंद असलेल्या मिळकती व आढळ न होणारे पैकी नळामुळे कराची थकबाकीमध्ये नाहक फुगवटा निर्माण होत आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १५२ मध्ये वसुल न होण्याजोगा कर निर्लेखित करणे ची तरतूद आहे. सदर तरतूदीव्या अनुषंगाने सर्व ५० पेठांमधील आढळ न होणाऱ्या मिळकती, दुबार नोंद असलेल्या मिळकती व आढळ न होणारे पैकी नळाची रक्क्म अधिनियमातील तरतूदीनुसार निर्लेखित करणेपुर्वी मनपाचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर ताज्या घडामोडी यामध्ये यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे. याबाबत सोलापूर शहरातील सर्व मिळकतदारांना व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदर यादीतील कोणत्याही मिळकतीबाबत आपणास काही हरकत / आक्षेप अथवा काही माहिती असल्यास smcpropartytax@gmail.com यावर अथवा मा.आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांचे नांवे लेखी स्वरुपात ७ दिवसाचे आत हरकत नोंदवावी अथवा माहिती दयावी. असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.







