साेलापूर, दक्षिण साेलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदिप खरबस यांनी मंजूर कामाचे बिल काढण्यासाठी दाेन हजार रूपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आले हाेते. 30 ऑक्टाेबर राेजी लाचखाेरीची कारवाई झाल्यानंतर 17 नाेव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आले नव्हते. शिवाय कारवाईनंतरही खरबस पंचायत समिती कार्यालयात कामकाज करीत असल्याचे तक्रार करण्यात आली हाेती. साेमवार दिनांक 17 नाेव्हेंबर जिल्हा परिषद प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी खरबस यांना 30 ऑक्टाेबरपासून निलंबित केला आहे. तसेच या काळात पंढरपूर पंचायत समिती कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संदिप खरबस यांनी दक्षिणमध्ये विस्तार अधिकारी पदभार घेतल्यापासून अनेक ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली हाेती. मात्र या तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे मंजूर कामाचे बिल काढण्यासाठी दाेन हजार रूपये लाच घेताना खरबस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 30 ऑक्टाेबर राेजी लाचखाेरीची कारवाई झाल्यानंतरही खरबस यांना निलंबित करण्यात आले नव्हते. 30 ऑक्टाेबर ते 17 नाेव्हेंबर या काळात खरबस यांनी कार्यालयात काम करीत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले. त्यामुळे या काळात झालेल्या कामकाजाचेही चाैकशी करून ते आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.







