सोलापूर : बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये गुरुवारी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यात्रेतील मानाच्या पहिल्या नंदीध्वजाची नागफणीचे मानकरी सोमनाथ मेंगाणे व सुधीर थोबडे (अळ्ळे) यांच्या हस्ते विधिवत पूजन करून नंदीध्वज पेलण्याच्या सरावास सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवयोगीशास्त्री केले होळीमठ, राजू स्वामी, शांतेश्वर स्वामी, नीलप्पा वाले यांनी पूजेचे पौरोहित्य केले. याप्रसंगी राजशेखर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, जयप्रकाश अमणगी, राजेश अमणगी, राजू भैरोपाटील, विजय भोगडे, रवी कोरे, योगिनाथ कुर्ले, अशोक वाले, गंगाधर कल्याणकर, शिवानंद सोन्ना, सोमनाथ सरडे, सागर स्वामी, सागर हुमनाबादकर, प्रथमेश हिरेहब्बू, यांच्यासह शिवराज कडगंची सिध्देश्वरभक्त उपस्थित होते.







