सोलापूर : आज दि. 22 नोव्हेंबर पासून सोलापूर- कोल्हापूर (हायकोर्ट) अशी बस सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर येथे हायकोर्टचे बेंच सुरु झाल्यामुळे सोलापूरकरांची बऱ्याच दिवसापासूनची ही मागणी होती की सकाळी लवकर कोल्हापूरसाठी बस उपलब्ध करून द्यावी. या त्यांच्या मागणीनुसार सोलापूर आगारातून आजपासून सदर बस सुरू करण्यात आली.
ही बस ही सोलापूर- मंगळवेढा -सांगोला -मिरज मार्गे कोल्हापूर येथे जाईल तसेच कोल्हापूर बस स्थानकातून थेट टाऊन हॉल (हायकोर्ट) पर्यंत सदर बस थेट प्रवाशांना पोचवेल तसेच निघतानाही कोल्हापूर मुख्य बस स्थानकातून निघून टाऊन हॉल (हायकोर्ट)ला येईल हायकोर्ट नंतर पुढे सोलापूर कडे रवाना होईल. याप्रसंगी विभाग नियंत्रक, अमोल गोंजारी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लिकार्जुन अंजूटगी, व सोलापूर येथील सर्व बस चालक वाहक उपस्थित होते .






सोलापूर बस स्थानकावरून सोलापूर सकाळी ०६.०० वाजता निघुन ११.१५ वाजता टाऊन हॉल, कोल्हापूर
कोल्हापूर, टाऊन हॉल येथून सायंकाळी ०६.०० वाजता निघून सोलापूर येथे येईल.
सदर बसचे आज सकाळी ०६.०० वाजता विधिवत पूजन करून सदर बस मार्गस्थ करण्यात आली .







