सोलापूर : सोलापूर ते गुड्डापूर पदयात्रेतील पदयात्रेकरुंना सलग 6 व्या वर्षीही वीरशैव व्हिजनतर्फे मोफत औषधे व प्रथमोपचार साहित्य देण्यात आले. संस्थापक श्री वेदमूर्ती राजशेखर स्वामी (आहेरवाडी) यांच्या नेतृत्वाखाली मागील 50 वर्षापासून सोलापूर ते गुड्डापूर पदयात्रा निघते. त्याचे उत्तराधिकारी श्री श्रीशैल स्वामी यांच्या सानिध्यात ही पदयात्रा गुड्डापूरकडे मार्गस्थ झाली. या पदयात्रेत सुमारे 200 भाविक सहभागी होतात. टाकळी येथे मल्लिनाथ बिराजदार यांच्या घरी गेल्या 20 वर्षापासून पदयात्रेकरुंना स्नान, अल्पोपहार व चहापान करण्यात येते पायी चालून चालून पदयात्रेकरुंना पायदुखी, अंगदुखी, जखमा आणि विविध आजार उद्भवतात. वाटेवर वैद्यकीय सुविधा मिळतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे त्यांना वीरशैव व्हिजनतर्फे उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते मोफत औषधे, वेदनाशामक गोळ्या व प्रथमोपचार साहित्य सुपूर्द करण्यात आले. यासाठी डॉ संजय कळके यांचे सहकार्य लाभले.
या पदयात्रेत यात्राप्रमुख श्रीशैल स्वामी, मल्लिनाथ बिराजदार (टाकळी), विजयकुमार बिराजदार, सुभाष इंडी, श्रीशैल आळगी, यशवंत बिराजदार, सोमनाथ परशेट्टी, गौरीशंकर तांडुरे, राजकुमार गाढवे, शिवानंद गुब्याड, आप्पासाहेब लिगाडे, महेश स्वामी, सोमनाथ बिराजदार, गंगाधर झुरळे यांचा सहभाग आहे.







