स्त्रिया पेक्षा पुरुषांमध्ये वंधत्वाचे प्रमाण जास्त — डॉ.मिलिंद पाटील
सोलापूर : सध्याची आहार पद्धती, वाढती व्यसनाधीनता, कामाचा ताण, आणि कमी वेळामध्ये जास्त पैसा कमावण्याची असलेली शर्यत याचा परिणाम शरीरावर मोठ्या प्रमाणात होतो म्हणून स्त्रिया पेक्षा पुरुषांमध्ये वंदत्वाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. असे मत शोभा नर्सिंग होम टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉक्टर मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. शोभा नर्सिंग होम टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये माता, पालक आणि बाळांचा गेट-टुगेदर व पाच हजार बालकांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पाटील हे बोलत होते.


शहरातील शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड , इंडो जर्मन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट मध्ये पाच हजाराहून अधिक टेस्ट ट्यूब बेबी चा जन्म झाला आहे. शोभा नर्सिंग होम या केंद्राचा समावेश सर्वाधिक यश प्रमाण असणाऱ्या जगातल्या काही निवृत्त केंद्रामध्ये केला जात आहे ही बाब सोलापूरकरांच्या दृष्टीने अभिमानाची असल्याचेही डॉ.मिलिंद पाटील यांनी सांगितले.
आपल्या महाराष्ट्र आणि भारत देशाबरोबर अमेरिका इंग्लंड जर्मनी सिंगापूर ऑस्ट्रेलिया इजराइल दुबई दक्षिण आफ्रिका व आघाती देशातून विनापत्य दांपत्य सोलापूर मध्ये येऊन आमच्या टेस्ट ट्यूब केंद्रामध्ये उपचार घेत आहेत आमच्या केंद्राचे यशस्वी उपचाराचे प्रमाण जास्त आहे. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनुभवी तज्ञ डॉक्टर्स यांच्या प्रयत्नामुळे या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे नाव जगात झाली आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर कौशल्याने तर करतोच त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर त्या महिलेची नऊ महिने विशेष काळजी घेतो बालकाच्या जन्मानंतर त्याच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून ट्रीटमेंट दिली जाते या विश्वासहारतेमुळेच आमच्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. यावेळी डॉ. शैलेश पाटील, डॉ. प्रतिभा पाटील डॉ. मनीषा पाटील, डॉ. गायत्री आपटे, डॉ. शुभांगी बमगोडे, डॉ. ज्योती गायकवाड डॉ. श्रुती पालिंब, अंजली कोळी हे उपस्थित होते.







