सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांची दोन अँक्रॅलिक कलर मध्ये पेंटिंग साकारली आहेत. 8 जानेवारी 2015 रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी अभिनेता धर्मेंद्र यांना दोन्ही पेंटिंग दाखवली. त्यावेळी धर्मेंद्र यांनी दोन्ही पेंटिंगवर सही करत अप्रतिम अशी दाद दिली होती. महेश गादेकर हे मुळात कलाकार आहेत. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले आहे. ते समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असले तरी चित्रकलेची आवड मात्र त्यांनी अजूनही जोपासली आहे. त्यांनी खासदार शरदचंद्र पवार, गुलजार यांच्यासह त्यांनी इतर अनेक पेंटिंग्ज साकारली आहेत.


…..
या दोन पेंटिंग मधील सिंगल पोट्रेट धर्मेंद्र यांना खूप आवडले. ते पोर्ट्रेट त्यांनी फार्म हाऊसमध्ये लावण्यासाठी मागितले. परंतु मी आठवण म्हणून माझ्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
महेश गादेकर







