सोलापूर : नांदणी हद्दीतील महाराजा ऑर्केस्ट्रा बार मध्यरात्री एकनंतरही सुरू होता. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना कोणीतरी त्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेथून २६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑर्केस्ट्रा बारचे मालक, व्यवस्थापक व ग्राहक, अशा २१ जणांविरुद्ध मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी रात्री दीड वाजता महाराजा ऑर्केस्ट्रा बार सुरूच होता. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर त्यांचे विशेष पथक १५ ते २० मिनिटात त्याठिकाणी पोचले. पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वातील पथकाने तेथे छापा टाकला. बारमधील लोक जास्त असल्याने या विशेष पथकाने मंद्रूप पोलिसांचीही मदत घेतली. पण, मंद्रूप पोलिसांना या ऑर्केस्ट्रा बारबद्दल माहिती नव्हते हे विशेष. विशेष पथकाने बार मालक रोहित चव्हाण, व्यवस्थापक संजीव गायकवाड यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री खूप उशीर झाल्याने १५ बारबालांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
ऑकेस्ट्र बारमध्ये सापडलेल्या संशयितांची नावे
संतोष ईरप्पा हिरेमठ, (रा. विजापूर नाका सोलापूर), नितीन दिपक जाधव (रा. श्रीहरी पार्क, जुळे सोलापूर), शरण्णाप्पा नागप्पा तेली (रा. टाकळी दक्षिण सोलापूर), शिवशरण सोमनाथ दिवटे, (वय 37, रा. टाकळी ता. दक्षिण सोलापूर), संजय मनोहर झेंडेकर (रा. टाकळी ता. दक्षिण सोलापूर), बबलू महमद नदाफ (रा. टाकळी, ता. द. सोलापूर), राजेश विलास गायकवाड (रा सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर), सचिन शिवाजी जाधव (रा. भैरु वस्ती, सोलापूर), सैफ फकरोददीन जमादार (रा. कमला नगर, सोलापूर), आकाश चंद्रकांत जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर), नंदु मुनीलाल गोस्वामी (रा. महाराजा बार नांदणी), दत्ता केशव जाधव (रा. 376, रामवाडी, सोलापूर), यतिराज सुधीर सुपाते (वय 29 वर्षे, रा. देगांव, ता. उत्तर सोलापूर), आदिनाथ हणमत बाबर (रा. जि. प. शाळा देगावं, ता. उत्तर सोलापूर), आदीत्य नागेश मेणसे (रा. सलगर वस्ती सोलापूर), अक्षय सतिश शेंडे (रा. दमाणी नगर, सोलापूर), प्रशांत सुखदेव घुले (रा. लक्ष्मी चाळ सोलापूर), गौस इसुफ विजापूर (रा. सलगर वस्ती सोलापूर), संतोष राजप्पा पाटील (रा बिदर, कर्नाटक), अन्वर हुसेन आत्तार (रा. जामखाना गल्ली विजापूर), विठठल गायकवाड (रा. सोलापूर).







