सोलापूर : जुळे सोलापूर परिसरात २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या तीन मोठ्या घरफोड्यांमागील रहस्य अखेर उलगडले आहे. चोरीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात चोरटे स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात फसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून लाखर्खाचा मुद्देमाल जप्त केला आहे. राघवेंद्र नाईक (वय ३२) व लक्ष्मण नाईक (वय ३२, दोघे रा. कर्नाटक.) अशी आरोपर्पीची नावे आहेत.
चोरीनंतर आरोपी विजापूरमध्ये सोन्याचे दागिने विकण्यासाठी गेले होते. मात्र सराफांनी पावती मागितल्याने त्यांचा प्लॅन अयशस्वी ठरला त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी त्यांनी परत सोलापुरातच, आणि विशेष म्हणजे ज्या भागात चोरी केली त्याच परिसरात दागिने विकण्याचा प्रयत्न केला. संशय येताच पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना अटक करण्यात यश मिळाले.
या गुन्ह्यांमुळे विजापूर नाका पोलीस ठाण्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी गुन्हे त्वरीत उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गतीमान करण्यात आला. तिन्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुन्हेगारी पब्दत आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा मागोवा घेतला. अखेर आरोपी दागिने विकण्यासाठी शहरात परतल्याचे कळताच पथकाने झटपट कारवाई करून दोयांना ताब्यात घेतले. मुद्देमालाची अचूक किंमत आणि आरोपींची सविस्तर गुन्हेगार माहिती लवकरच पोलिसांकडून जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सलग तीन गुन्ह्यांचे गूढ केवळ दहा दिवसांत उलगडून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे.







