मल्लाव समाजात कोसळला दुःखाचा डोंगर
तिर्हे उत्तर सोलापूर : उत्तर तालुक्यातील तिऱ्हे येथील अविनाश सीताराम मल्लाव (वय २३) या युवकाने बाळे येथील रेल्वे पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घटनेची नोंद आत्महत्या अशी करण्यात आली आहे. अविनाश हा रात्री जेवण करून बाहेर पडला. उशीर झाला तरी देखील आला नाही, फोन देखील उचलत नसल्याने, शोधा शोध केली. तरी देखील माहिती मिळत नसल्याने सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांना बाळे पुलाजवळ घडलेल्या घटनेची मिळालेल्या माहितीनुसार चौकशी केली असता तो मृतदेह अविनाशचा असल्याचे निष्पन्न झाले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास सोलापूर तालुका पोलीस करत आहे. अविनाशच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.








