सोलापूर, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्र काढले असून त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तश्या सुचना आणि माहितीची प्रत राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना पाठवले आहे .
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाकडे जवळपास ४५० इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सोलापूर शहरात भारतीय जनता पार्टीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची संख्या आहे.
सोलापूर राष्ट्रवादीने दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांचे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीबद्दल सोलापूर शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, जेष्ठ नेते तौफिक शेख,जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांनी अभिनंदन करून या निवडीबद्दल स्वागत केले आहे.









