सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या नाजूक प्रकरणामुळे राष्ट्रवादी पक्षामधून निलंबन करण्यात आले होते. परंतु ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई येथे मनोहर सपाटे यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे पत्र त्यांना दिले आहे.

शशिकांत शिंदे यांच्याकडून पत्र मिळाल्याचे फोटो आणि पत्र मनोहर सपाटे यांच्यामार्फत तानाजी माने यांनी प्रसार माध्यमांकडे पाठवले आहेत. निलंबन मागे घेण्यात आल्यामुळे आपण आता प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे मनोहर सपाटे यांनी सांगितले आहे.









