सोलापूर : एन्जोप्लास्टी म्हणजे काय ? ती कशी केली जाते? स्टेंट कसा बसवला जातो ? अशा प्रश्नांच्या उत्तरासह हृदयविकारावरील प्रगत उपचार तंत्रज्ञान सोलापूरकरांनी जाणून घेतले. एसीएस हॉस्पिटलतर्फे शनिवारी आयएमए हॉलमध्ये हृदयविकारावरील प्रगत उपचारासंदर्भात जनजागृती प्रदर्शनी व प्रात्यक्षिकांचे सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनीचे उद्घाटन प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, तसेच आर. एम. ई. ए. चे अध्यक्ष नीलकंठ वाकचौरे, उद्योजक सुहास आदमाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. सुहासिनी शहा, डॉ. प्रमोद पवार, राहुल कारीमुंगी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. सुहासिनी शहा, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. स्नेहल पवार, डॉ. रुची गांधी, डॉ. नेहा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कार्य केल्याशिवाय त्या कार्यात अचूकता येत नाही. हे ओळखून एसीएस हॉस्पिटलने सोलापुरात हृदयविकारावरील उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञान आणले आहे. याचे कौतुक आहे. डॉ. प्रमोद पवार यांनी प्रास्ताविक केले. रूपाली हब्बा आणि अनिता नन्ना यांनी सूत्रसंचालन केले.










