सोलापूर : ए जी पाटील पॉलिटेक्निक मध्ये कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रसिद्ध समुपदेशक आय आय मुजावर त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यानंतर संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.प्रमुख पाहुणे व वक्ते मुजावर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आत्मपरीक्षण व एकाग्र साधनेमुळे अभियंत्यांना व्यावसायिक व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सुवर्ण मध्य साधता येईल.उपप्राचार्य श्री एस के मोहिते यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या Vaave सॉफ्टवेअरची माहिती दिली.

यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपली कॉलेज बद्दलची भावना भाषणातून व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री एस ए पाटील, उपाध्यक्ष श्री एस एस पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए चौगुले व उपप्राचार्य एस के मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व सहभोजनाने झाली.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य एस. के. मोहिते, शैक्षणिक समन्वयक एस. एन. गवंडी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. एम. कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एन. बी. पवार, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख टी. एल. पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी, प्रथम वर्ष इन्चार्ज व्ही. आर. आवटे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . एल एस बिराजदार यांनी केले तर श्री एल एस मरगुर यांनी आभार प्रदर्शन केले.










