सोलापूर : मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापकपदी बसप्पा घाटे यांची निवड करून नवीन वर्षाची भेट दिली . शिक्षण प्रसारक मंडळ, मंद्रूप संस्थेचे सचिव तथा माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांनी निवड केली. लोकसेवा शाळेतील शिक्षक व विद्यार्थी प्रिय हिंदी शिक्षक सर्व धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये हिरीरीने काम करणारे म्हणून घाटे यांची ख्याती आहे.
यावेळी उपप्राचार्य म्हणून बसप्पा कुमठेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या निवड करण्याच्या शुभारंभा प्रसंगी संस्थेचे सहसचिव तथा माजी युवा सरपंच अप्पासाहेब म्हेत्रे, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी , श्रीधर टेळे ,प्रा.अडवीतोटे आदी उपस्थित होते.
नव नियुक्त मुख्याध्यापकांचे माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष शिवशरण अण्णा पाटील व संचालक मंडळ,ग्रामदैवत मळसिध्दप्पाचे पुजारी,व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मल्लिकार्जुन वस्तीगृहाचे अधिक्षक व समस्त शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन धानप्पा बंगले यांनी केले.












