सोलापूर : समजावून सांगूनही ऐकत नसल्याने त्याचा लाकडी दांडकंयाने व प्लास्टिक पाईपने मारहाण करून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी नागेश कोळेकर व आशुतोष ऊर्फ आवि गाडेकर दोघे रा. तोडकर वस्ती, बाळे, सोलापूर यांची मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश कटारिया यांनी निर्दोष मुक्तता केली.

तोडकर वस्ती बाळे येथील लखन रघुनाथ गायकवाड हा दारू पिऊन स्वतःच्याच आईला शिवीगाळ करीत असल्याने व यात हकिकत अशी की, दि.१६/५/२०२४ रोजी नागेश कोळेकर व आशुतोष गाडेकर हे फिर्यादी अल्का रघुनाथ गायकवाड यांचा मुलगा लखन यास घरी घेवून आले होते. त्यावेळी फिर्यादीचे गल्लीतील अजय मोहन भोसले हा घरी आला होता. लखन हा फिर्यादीस दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून अश्लील शिवीगाळ करीत होता. नागेश व आशुतोष हे आईला का शिव्या देतो, शिव्या देवू नको असे सांगत होते. नागेश याने लाकडाचे दांडका व आशुतोषने प्लास्टिक पाईपने लखनच्ला म ारहाण केली.

लखनला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आरोपींनी फिर्यादीच्या समोर मारहाण केल्याने फिर्यादी घाबरलेली होती. त्यानंतर फिर्यादीने सदरची घटना मुलगा राम व सर्व नातेवाईक यांना सांगितली व उपचारादरम्यान लखन चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याचे फिर्यादीत नम द आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्यात नागेश कोळेकर व आशुतोष गाडेकर यांना अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपींविरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. आरोपीच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन निर्दोष मुक्तता करण्यात आली. यात आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. म ीरा पाटील, अॅड. सोहेल शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. प्रकाश जन्नु यांनी काम पाहिले.










