सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर गत एक वर्षापासून रिक्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्षपद अखेर भरण्यात आले आहे. यापदी कोठे परिवाराचेच डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हैदराबाद येथील पद्मशाली भवनात शनिवारी अखिल भारतीय पद्मशाली संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांना पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेले पत्र देण्यात आले.

यावेळी अखिल भारत पद्मशाली संघाच गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष कंदकटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल ,राजकीय विभागाचे अध्यक्ष बोलला शिवशंकर, सेक्रेटरी तुकेश भैरी, महाराष्ट्रचे निरीक्षक संगा, मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष जगनबाबू गंजी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, राकेश पुंजाल, सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचे समर्थक उपस्थित होते.

समाजाच्या एकी व प्रगतीसाठी प्रयत्न करणार : डॉ. कोठे
अखिल भारतीय संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत सोबत असल्याची ग्वाही दिली. सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की, कोठे परिवाराला समाजसेवेचा वारसा तात्यासाहेब कोठे यांच्यापासून मिळाला असून या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊन समाजाचे एकी व प्रगतीसाठी करणार आहे.











