सोलापूर : ब्राम्हण ब्रीझ नेटवर्क असोसिएशन (BBNA) सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक १० व ११ जानेवारी २०२६ रोजी बीबीएनए संक्रांत महोत्सव २०२६ अंतर्गत प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती बीबीएनए समन्वयक मानसी कुलकर्णी व महिला टीमच्या वतीने आश्लेषा निपणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यंदाचे हे महोत्सवाचे 9 वे वर्ष आहे. प्रदर्शनात लहान मुलांचे कपडे, आलेपाक वडी, घरगुती कॉस्मेटिक्स, माती व MDF रंगोळी, दागिने, हर्बल उत्पादने, क्राफ्ट, ज्वेलरी, मसाले, रेजिन व कॅन्डल आर्ट आदी विविध स्टॉल्स असणार आहेत. यासोबतच खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स राहणार आहेत.

ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स व लकी ड्रॉ कूपनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूरकरांनी कुटुंबासह येऊन संक्रांत सणाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन BBNA सोलापूर शाखेने केले आहे.पत्रकार परिषदेला पृथा हलसगीकर, मनीषा औंगाबादकर, सोनाली बेवूर अमृता गोसावी व संजय औंगाबादकर उपस्थित होते.











