सोलापूर : कांद्याची बांगलादेशला होणारी निर्यातबंदी थांबल्याने कांद्याचे दर कवडीमोल दराने विक्री करावे लागत आहे. एकरी ७० हजार रूपये खर्च केलेल्या कांदा उत्पादकांना खर्चही निघत नसल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.शनिवारी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जवळपास ५०० हून अधिक ट्रक कांद्याची आवक झाली होती.
दर मात्र सरासरी एक हजार रूपये असल्याने कांदा लागवड केलेले पैसेही निघत नाहीत. बांगलादेशला कांद्याची निर्यात सुरू केल्याने दर ३ हजार रूपये प्रतिक्विटंल ओलांडले होते. परंतु बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे पुन्हा भारतातील होणारी कांद्याची निर्यात बंद केल्याने याचा फटका कांदा उत्पादकांना चांगलाच बसला आहे. शेतकऱ्यांचा कांदा सुरू असताना निर्यात उठविली नाही तर मग व्यापाऱ्यांचा कांदा सुरू झाल्यानंतर निर्यात उठविणार आहे का असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

निर्यात चालू राहिली तर कांद्याला चांगला दर मिळाला असता असा आशावाद शेतकऱ्यांना होता. कांदा उत्पादकांचे गणित कोलमडल्याने शेतकरी पुढे पाच वर्ष मागे गेला असल्याची भावना शेतकऱ्यांमधून निघत आहे. कारण लागवड करण्यात आलेल्या कांद्याचा खर्चच निघत नाही.










