सोलापूर ; ‘सामान्य जनतेच्या वेदना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करत असतात. समाजाला साक्षर करणारे पत्रकार हेच समाजाचे खरे प्रबोधनकार असतात.आपण जी बातमी वाचतो त्या बातमीमागे त्यांची खूप मेहनत असते.
समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या पत्रकारांच्या व्यथा देखील राज्यकर्त्यांनी व समाजाने समजून घेतले पाहिजे.आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील समस्या मांडणारे पत्रकार हेच खरे महागुरू होतं’ असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक तथा माजी प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे यांनी केले.सो. स.सत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट सोलापूर संचलित सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कै.बाबुरावसा दत्तात्रयसा भुमकर पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभा प्रसंगी डॉ.उबाळे हे बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजूसा भुमकर हे उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल, ट्रस्टचे सदस्य सर्वश्री भरतकुमारसा शालगर, गणेशसा दामजी, संजीवसा रंगरेज, शिरीषसा कोल्हापुरे, तुकारामसा पवार यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद, इंग्रजी मध्यमाच्या मुख्याध्यापिका सविता हातवळणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. यावर्षी
नागराज बगले (संचार ),
विनोद कामतकर (दिव्य मराठी ),
प्रभू वारशेट्टी ( सकाळ ),
श्रीशैल भद्रशेट्टी (तरुण भारत संवाद ),
शरीफ सय्यद( पुण्यनगरी ),
अविनाश गायकवाड (तरुण भारत ),
संतोष चितापुरे (पुढारी ),
विष्णू सुरवसे (सुराज्य ),
प्रीतम पंडित (न्यूज एटी एन),
मनोज हुलसुरे (इन सोलापूर न्यूज ),
सोनू शहानूरकर ( बी.आर.न्यूज),
बाळकृष्ण दोड्डी (लोकमत ),
शेखर गोतसुर्वे (दैनिक नवराष्ट्र ),
नितीन पात्रे (ब्रेन न्यूज )
आदी पत्रकारांचा आदर्श पत्रकार म्हणून शाल,श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी कै. बाबुरावसा भुमकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. मंजुषा काशीद यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय कबाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गजाननसा गोयल यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश आळंगे,मल्लेश पुरवंत,अजय कोल्हापुरे,उमेश गायकवाड,नागेश दलभंजन, प्रमोद काकडे यांनी परिश्रम घेतले.










