सोलापूर: सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव दि. १७ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्रे (UAV) उडवण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १६३ (१) अन्वये हे मनाई आदेश जारी केले आहेत.
आदेशातील महत्त्वाचे मुद्दे:
कालावधी: हा आदेश १७ जानेवारी २०२६ (००:०१ वा.) पासून ३१ जानेवारी २०२६ (२४:०० वा.) पर्यंत लागू असेल.
कारण: समाजकंटकांकडून ड्रोनचा वापर करून राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धोका निर्माण होऊ शकत ,अशी शक्यता गृहीत धरून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
क्षेत्र: संपूर्ण सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कोणत्याही व्यक्तीला ड्रोन उडवणे, त्याद्वारे छायाचित्रण करणे किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रोन प्रक्षेपण करण्यास मनाई असेल.
कारवाईचा इशारा:
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि इतर संबंधित कायद्यांनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तातडीच्या परिस्थितीमुळे हा आदेश एकतर्फी पद्धतीने लागू करण्यात आला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.










