सोलापूर : पद्मशाली ज्ञाती संस्थेच्यावतीने महर्षी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त बुधवार, २१ जानेवारी रोजी सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

.सकाळी सहा वाजता महारुद्राभिषेक, साडेसात वाजता ध्वजारोहण तर आठ वाजता होमहवन होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत पालखी सोहळा पार पडणार आहे.दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवलेल्या पद्मशाली समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी केले आहे.

तसेच श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मद्दा मंगल कार्यालय येथील गणेश मंदिरात २२, २४ व २५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.










