६ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
सोलापूर: सोलापूर-बार्शी रोडवरील मौजे खेडपाटी येथील ‘घुंगरू कला केंद्रा’वर सोलापूर तालुका पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एकूण ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी गोपनीय माहिती मिळाली की, खेडपाटी येथील घुंगरू कला केंद्रात काही महिला अश्लील हावभाव करून डान्स करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजता कला केंद्रावर छापा टाकला. यावेळी दोन महिला अश्लील हावभाव करत डान्स करताना आढळल्या, तर काही प्रेक्षकही अश्लील वर्तन करताना दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मॅनेजर अक्षय नागनाथ माने याला ताब्यात घेतले असून, केंद्राचा मालक अरुण रोडगे असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी केला एवढा मुद्देमाल जप्त : ५,०००/- रुपये किमतीचा ‘Takal’ कंपनीचा साऊंड बॉक्स. ६,००,०००/- रुपये किमतीची मारुती सुझुकी स्वीफ्ट कार. ६ लाख ५ हजार रुपये.
या प्रकरणी पोलिसांनी २ महिला कलाकार, ३ प्रेक्षक, मॅनेजर आणि मालक अशा एकूण ७ आरोपींविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, मपोउपनि सीमा डोंगरीतोट, पोहवा जगताप, पोना अभिजीत साळुंखे, पोकॉ अकबर शेख आणि महिला पोलीस अंमलदार पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.










