सोलापूर : गड्डा यात्रेतून चोरट्यांनी रोख रखमेसह ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत शैला राहुल जानराव (वय ५५, रा. मुकुंदनगर, भवानी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या गड्डा यात्रेत गेल्या होत्या. पंचकट्टा ते होममैदान दरम्यान स्टॉलवर खरेदीकरिता गेल्या असता तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या साईडबॅगमध्ये असलेली रोख रक्कम व ९.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रासलेट असलेली पर्स असा ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.










