सोलापूर :- चालू वर्षी माघ यात्रा सोहळा 2026 वार- गुरूवार, दि.29 जानेवारी 2026 रोजी अंपन्न होत असून यात्रेच्या अनुषंगाने सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचेकडील प्रस्ताव क्र.गो जा क्र.3578778/2026 दि. 16/01/2026 अन्वये, पंढरपूर शहरामध्ये माघ यात्रा सोहळा दि.23जानेवारी 2026 ते 01 फेब्रुवारी 2026 या कालावधीत असून माघ यात्रेसाठी सुमारे 03 ते 04 लाख भाविक शहरात येतात. दि.28 जानेवारी 2026 रोजी दशमी व दि.29 जानेवारी 2026 रोजी एकादशी असून माघ यात्रेकरिता आलेले भाविक चंद्रभागा नदीपात्रातून महाद्वार घाट, महाद्वार चौक, उत्पात गल्ली व इतर बोळातून श्री संत नामदेव महाराज पायरी याठिकाणी येत असतात व दर्शन घेवून नगरप्रदक्षिणा करतात, ही परंपरा आहे. त्यामुळे मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी प्रशासनास अडचणी निर्माण होतात. मंदिराकडून बाहेर पडणेसाठी पश्चिमद्वार ते चौफाळा हा एक महत्वाचा मार्ग आहे, त्यामुळे सदर मार्गावरून मंदिराकडे प्रवेश दिल्यामुळे वारकरी यांची ये-जा चालू राहून गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि पश्चिमद्वार ते चौफाळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी /भाविक हे श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारुती चोक – महाद्वार चौक मार्ग नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. तसेच प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी / भाविकांना बाहेर पडणेचा एकेरी रहदारी मार्ग केलेस गर्दीवर नियंत्रण करणे सुरक्षित होईल. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी / भाविकांसाठी बाहेर पडणेकरीता एकेरी रहदारीसाठी होणे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे असल्याने त्याबाबत योग्य ते आदेश होणेची विनंती सहा पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी सादर केली आहे.










