सोलापूर : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन व एसीएस हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक राईड रविवारी (ता. २५) होणार आहे.
या राईडला एसीएस ‘ हॉस्पिटल, भैय्या चौक येथून प्रारंभहोणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन एसीएस हॉस्पिटलचे डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. पवार, डॉ. राहुल कारिमुंगी, डॉ. दीपक गायकवाड, आरआरसीएचे अध्यक्ष अभिनय भावठाणकर, श्रीधर वडनाळ, पराग दोशी, कृष्णा कांबळे, अमर तमशेट्टी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९८९०६२८५३३ वर संपर्क साधावा.

नियम व अटी – 1– वाहतुकीचे नियम पाळून सर्वांनी सुरक्षितपणे सायकलिंग करावे.
2- संयोजकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
3,- हेल्मेट परिधान करून येणे
4- रॅलीमध्ये दोन सायकल स्वार एकत्र येऊन दोनच्या लाईनीने जाणे, मागेपुढे होऊ नये
5- ACS टीम व रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशन, सोलापूर हे फक्त आयोजन करते असून सहभागी सदस्यांनी स्व-जबाबदारीवर सायकलिंग करणे.
6- आमचा उद्देश प्रदूषण विरहित सायकलिंग करून तंदुरुस्ती व हृदय मजबूत करून सोलापुरात सायकलिंग चळवळ तयार करणे.
असा असणार मार्ग: ACS हॉस्पिटल _ भैय्या चौक _श्री शिवाजी महाराज चौक turn _ बाळी वेस _ मधला मारुती _ कोनतम चौक _ कन्ना चौक _ अक्कलकोट पाणी टाकी _ अशोक चौक पोलिस चौकी _ गेट्याल चौक _ गुरुनानक चौक _ महावीर चौक _ पत्रकार भवन _ केंद्रीय विद्यालय रोड _ स्टेशन रोड _ स्टेशन _ भैय्या चौक _ ACS हॉस्पिटल ( रॅली समारोप)
सहभागी सदस्यांसाठी : भारतीय झेंडा, पाणी, बॉटल, चहा, रुचकर नाष्टा, बँक अप सपोर्ट










