सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहरामध्ये समाजसेवेचा एक आदर्श उपक्रम राबवण्यात येणार आहे. आधार क्रिटीकल केअर हॉस्पिटल, आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सोलापूर मेडिस्कॅन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, याद्वारे गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. हे शिबीर उद्या सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत सुरू राहील. शिबिराचे आयोजन . डॉ योगेश राठोड आणि युवराज (भैया) राठोड तसेच सोलापूर मेडिस्कॅन डायग्नोस्टिक सेंटर यांनी केले आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे ही आवाहन करण्यात आले आहे…
रक्तदात्यांसाठी विशेष योजना : आयोजकांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका विशेष योजनेची घोषणा केली आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला एक ‘स्मार्ट हेल्थ कार्ड’ मोफत दिले जाणार आहे. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे पुढील वर्षभरासाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांवर टेस्टवर थेट २५% सूट मिळणार आहे.

याशिवाय, प्रत्येक रक्तदात्याला एक आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.प्रमुख आयोजक आणि प्रेरणाया सामाजिक उपक्रमाचे नियोजन डॉ. योगेश राठोड आणि युवराज (भैया) राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि प्रजासत्ताक दिनी देशसेवेचा एक भाग म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत,” अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या आहेत.

सहभागासाठी आवाहनसध्याच्या काळात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










