सोलापूर: जुळे सोलापूर येथील रत्न मंजिरी सोसायटी परिसरातील गणेश नाईक विद्यामंदिर शाळेत २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधनकार क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. राजशेखर बिराजदार-पाटील हे होते.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील रघोजी किडनी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डॉ. निहारिका रघोजी आणि दैनिक बाळकडूचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख . साहेबराव परबत यांची उपस्थिती होती.याप्रसंगी अध्यक्ष ॲड. राजशेखर बिराजदार-पाटील व डॉ. निहारिका रघोजी यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

तसेच साहेबराव परबत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम होते. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी दमदार पोवाडा सादर करून शिवकालीन आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागवल्या.

या सोहळ्यास शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार व मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार-पाटील प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योती आळगीयांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मदन पोलके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्मिता पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.










