सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे अधिकृत पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असल्याचे शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी पत्राद्वारे कळवले आहे. सोलापूरचे शहरप्रमुख सचिन मोहन चव्हाण यांना याबाबतचे पत्र पाठवण्यात आले असून, सोलापूर महापालिकेत गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड करावी आणि या सूचनेचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या निवडीमुळे सोलापूर महापालिकेच्या राजकारणात आणि पक्षसंघटनेत अमोल शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.











