सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:
सोलापूर: सोलापूर ग्रामीण हद्दीतील गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत नारायण शेंडगे (रा. पिसेवाडी, वेळापूर, ता. माळशिरस) याच्यावर M.P.D.A. कायद्यान्वये कारवाई करून त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्धता करण्यात आली आहे.

असून अवधूत शेंडगे हा एक अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर वेळापूर आणि अकलूज पोलीस ठाण्यात तब्बल ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, अवैध सावकारी,घातक हत्यारांचा वापर करून दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणेवारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही शेंडगे याच्या वर्तनात बदल झाला नव्हता. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य जनतेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येत होती. त्यानुसार त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांचा इशारा: “सोलापूर ग्रामीण हद्दीत वाळूतस्करी, शरीराविषयक गुन्हे, अवैध दारू विक्री आणि मालाविषयक गुन्हे करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. अशा सर्व सराईत गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासले जात असून, येत्या काळात त्यांच्यावरही ‘एमपीडीए’ सारखी कठोर कारवाई करण्यात येईल.”अतुल वि. कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण











