भोंदू बाबा प्रसाद म्हणून प्रत्येक वेळी तळहातावर द्यायचा वेगळच काही..!
सोलापूर : घरातून गुप्त धनाचा म्हणजेच सोन्याचा हंडा काढून देतो, असे सांगून गोविंद मल्लिकार्जुन वंगारी यांच्याकडून १ कोटी ८७ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद कादरसाब शेख (रा. आदिलशाहीनगर) याला गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑक्टोबर रोजी विजापूर येथून अटक केली. त्याला न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलिस आरोपी शेख याने फिर्यादी वंगारी यांना मोहात ओढून विविध कारणे सांगत त्याच्याकडून पैशाची मागणी करीत होता. काही वेळा विधी करण्यासाठी पैसे घेत होता, तर काहीवेळा लक्ष्मी पैसे देण्यास तयार नसल्याचे कारण सांगत त्यांच्याकडून प्रत्येकवेळी लाखभर रुपये, असे एकूण १ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये घेतले होते.

याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तेथून पोबारा झाला होता. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची चार पथके होती. मोहम्मद शेख याचा शोध घेत असताना तो विजापूर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी विजापूर गाठलं. पण त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही. त्यानंतर मात्र ९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सपोनि दत्तात्रय काळे यांना मिळालेल्या
खात्रीदायक माहितीवरून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, सपोनि दत्तात्रय काळे, पोलिस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, निलोफर तांबोळी, महेश पाटील, राजू मुदगल, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, भारत पाटील, अजय गुंड, श्याम सुरवसे, बाळू काळे यांनी केली.
साथीदारांचा शोध सुरू
आरोपींने असे कृत्य राज्यासह कर्नाटकात ही अनेक ठिकाणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांकडून आरोपीकडून याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. शिवाय, यात त्याची साथ कोणी दिली, याची ही माहिती घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे साहित्य केले जप्त
आरोपी शेख याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. यात दोन मोठे पितळी हांडे, त्यावरील दोन झाकण, हिरवे कापड, लाल कापड, अशा विविध साहित्यांचा समावेश आहे. दरम्यान, आरोपींकडून अद्यापपर्यंत रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.








