बाळाच्या शारीरिक मानसिक आरोग्य वाढीसाठी सुवर्णप्रशासन संस्काराचे शिबिर…
सुवर्णप्राशन म्हणजे काय?
सोलापूर : सुवर्ण म्हणजे सोने. सोन्याचे भस्म, आणि काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधे यांचे मध व तुपामध्ये मिश्रण केले जाते व दर महिन्याच्या पवित्र पुष्य नक्षत्रावर ते चाटण लहान मुलांना चाटविले जाते. यालाच सुवर्णप्राशन असे म्हणतात.
सुवर्णप्राशन कोणासाठी उपयुक्त?
नवजात बालकापासून ते 16 वर्षांपर्यंतच्या सर्वाना सुवर्णप्राशन करता येते. काही वर्ष हे औषध नियमित घेतल्यास चांगला फायदा झालेला दिसून येतो.

सुवर्णप्राशनाचे फायदे:
मुलांचा सर्वांगीण (बौद्धिक व शारीरिक) विकास होण्यास मदत मिळते रोग प्रतिकारशक्ती वाढते. संसर्गजन्य रोग तसेच ऋतुबदलांमुळे होणाऱ्या आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते….
धी – बुद्धी,
धृती – धारणाशक्ती,
स्मृती – स्मरणशक्ती,
मेधा – आकलनशक्ती यांचा विकास उत्तम प्रकारे होतो शारीरिक बल वाढते आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते सुवर्णप्राशन मुलांना अधिक निरोगी बनविण्यास मदत करते
सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम् ।
आयुष्यं मंगलं पुण्यम वृष्यं वर्ण्यमं ग्रहापहम् ।।
पत्ता : पत्ता :शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय शुक्रवार पेठ,टिळक चौक जवळ, सोलापूर..
बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५
वेळ : स.९ ते सायं. ७
वय : १ महिने ते १० वर्षांपर्यंत दरमहिन्याच्या पुष्य नक्षत्र दिनी..!








