सोलापूर : शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, सोलापूर येथे बालरोग विभागांतर्गत दर महिन्याच्या पुष्यनक्षत्रादिनी बाळांच्या शारीरिक व मानसीक आरोग्य वाढीसाठी ‘सुर्वणप्राशन’ संस्कार केला जातो. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी आयुर्वेदाचे आराध्य दैवत धन्वंतरी यांची विधिवत पूजा पालकाच्या हस्ते करून या संस्कारांची सुरुवात करण्यात आली. या दिवशी वयाच्या १ महिने ते १० वर्षोपर्यतच्या बालकांना सुर्वणप्राशन डोस दिले जातात याप्रसंगी प्राचार्या डॉ. वीणा जावळे, प्रशासकिय अधिकारी अनुप दोशी बालरोग विभाग प्रमुख डॉ.रमेश शेंडगे, अंतर्वासीयता विद्यार्थी व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.













सुर्वणप्राशन संस्काराचे फायदे
- मुलाची बुध्दीमता, स्मरणशक्ती व रोगप्रतिकारशक्ती वाढते.शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होऊन मुले चपळ व हुशार होतात.
- आमच्या सुर्वण प्राशनाचे वैशिष्ट्ये :
गिर गायीचे तूप हे खास पोर्णिमेच्या दिवशी पारंपरीक पध्दतीने बनवले जाते तसेच यातील सुर्वण भस्म व इतर औषधी 107 वर्षे जुन्या रसशाळेत तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली बनवली जातात.








