Saturday, January 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पांडुरंग साखर कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ..

राजेश भोई by राजेश भोई
October 15, 2025
in सोलापूर जिल्हा
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पांडुरंग साखर कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ..
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर, : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील १५ साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (ता. माळशिरस) येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, कारखान्याच्या १० हजार टन विस्तारीकरण गाळप, पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री .फडणवीस म्हणाले, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने १० हजार मे.टन प्रति दिन गाळप क्षमता गाठली आहे आणि पोटॅश उत्पादन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना योग्य एफआरपी आणि इतर सुविधा देण्याचे काम कारखान्याने केले आहे. इथेनॉल करताना निर्माण होणाऱ्या उपउत्पादनातून सीबीजीसारखे अतिशय स्वच्छ इंधन तयार करता येते. साखर उत्पादनात आतापर्यंत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या बाबी उत्पन्नाचे साधन ठरत आहेत. त्यामुळे कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करावा, असे आवाहन त्यांनी केले.कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना श्री.फडणवीस म्हणाले, त्यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांच्यासोबत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. समाजात अशाप्रकारचे निस्पृह नेते फार थोडे पहायला मिळतात, स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी मोठेपण मिळविले. त्यांना सर्व मोठे मालक म्हणत असले तरी पंढरीच्या पांडुरंगाला मालक समजून सेवेकऱ्याच्या भावनेने त्यांनी आजन्म सामान्य माणसाची सेवा केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय हे मोठ्या मालकांनी कमावलेले प्रेम आहे. ज्यांची सत्ता समाजाच्या मनावर असते ती कायम टिकते, म्हणूनच सर्वजण त्यांच्या प्रेमापोटी आले, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येकाशी त्याच्या भाषेत संवाद साधणारे त्यांचे शिस्तप्रिय, कणखर व्यक्तिमत्व होते. सामान्यातल्या सामान्य माणसाची सेवा करण्याचे कार्य त्यांनी केले. अनेक संस्था उभ्या करून या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिले आणि विश्वस्ताच्या भावनेतून कार्य केले. प्रत्येक संस्था सचोटीने चालविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचा स्पर्श लाभलेल्या संस्था यशस्वी ठरल्या आहेत. अत्यंत संवेदनशीलतेने समाजात परिवर्तन घडविणारी प्रत्येक संस्था त्यांनी उभी केली, त्यात पारदर्शकता आणली आणि त्यातून सामान्य माणसाचे कल्याण साधले. जीवनाच्या अखेरपर्यंत कर्तव्यभावनेने त्यांनी कार्य केले. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर एसटी फायद्यात येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्यासोबत काम करताना आपले जीवन समृद्ध झाले, अशा शब्दात .फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचेही श्री.फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. परिचारक यांनी केले. कै. सुधाकरपंत परिचारक यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी आपले आयुष्य वेचले. जिल्ह्यात हरितक्रांती करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रयत्न केले. समाजासाठी सर्वकाही अर्पण करणारे त्यांचे जीवन इतरांसाठी आदर्शवत होते. नागरिकांच्या इच्छेखातर त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याचे ते म्हणाले. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे २० हजार सभासद असून कारखाना नफ्यात आहे. आज १० हजार मे.टनाचा टप्पा कारखान्याने गाठला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्यावतीने मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमास राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, नारायण पाटील, दिलीप सोपल, बाबासाहेब देशमुख, राजू खरे, माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, शहाजी पाटील, दीपक साळुंखे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्यासह उमेश परिचारक, लोकप्रतिनिधी, कारखान्याचे सभासद, नागरिक उपस्थित होते.

Previous Post

८७२ कोटी रुपयाचे शहराच्या अंतर्गत जलवाहिनीचे काम होणार आहे.; पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांना २१ लाखांचा धनादेश सुपुर्द

Related Posts

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!
राजकारण

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..
सोलापूर जिल्हा

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..
सोलापूर जिल्हा

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप
सोलापूर जिल्हा

दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप

January 30, 2026
अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!
सोलापूर जिल्हा

अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!

January 30, 2026
मोक्का’ प्रकरणातील विकास भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयाने केले जामीन मंजूर..!
सोलापूर जिल्हा

मोक्का’ प्रकरणातील विकास भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयाने केले जामीन मंजूर..!

January 30, 2026
Next Post
अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांना २१ लाखांचा धनादेश सुपुर्द

अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांना २१ लाखांचा धनादेश सुपुर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025